प्रवरा नदीत उडी मारलेल्या तरुणाचा मृतदेहच आला हाती 

शेअर करा

नगर जिल्ह्यात नेवासा शहरात गंगानगर भागात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून एका युवकाने शनिवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास प्रवरा नदीवरील पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , संतोष नामदेव कनगरे ( वय 29 वर्ष ) असे मयत तरुणाचे नाव असून नेवासा शहरातील गंगानगर भागात तो राहत होता. संध्याकाळी चारच्या सुमारास त्याने पुलावरून नदीपात्रात उडी घेतली त्यानंतर परिसरातील नागरिकांनी शोध मोहीम सुरू केली आणि काही कालावधीनंतर त्याचा मृतदेह गाळात रुतून बसलेला आढळून आला. 

सदर घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तात्काळ पोलीस नाईक शहाजी आंधळे व इतर कर्मचारी यांच्यासोबत घटनास्थळी धाव घेतली. संतोष कनगरे याने टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही . 


शेअर करा