2024 ची नीट परीक्षा वादात सापडलेली असून सरकारने याप्रकरणी आता चौकशी नेमण्याची घोषणा केलेली आहे. परीक्षेच्या निकालात गडबड गोंधळ झाल्याच्या आरोपानंतर फेरपरीक्षेची देखील मागणी जोर पकडू लागलेली आहे.
देशात सुमारे 557 शहरांमध्ये आणि परदेशातील चौदा शहरात नीट युजी परीक्षा पाच मे रोजी झालेली होती आणि सुमारे 24 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते. नीट परीक्षेच्या माध्यमातुन एमबीबीएस बीडीएस सोबतच इतर वैद्यकीय पदवी परीक्षेसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.
एमबीबीएस हे अनेक विद्यार्थ्यांचे पहिले ध्येय असते त्यासाठी दिवसरात्र एक करून विद्यार्थी अभ्यास करतात. अनेक कोचिंग क्लासची महागडी तगडी फी भरून संपूर्ण कुटुंब देखील या प्रक्रियेत मोठी मेहनत घेते. चार जूनला नीट युजीचा निकाल जाहीर झाला त्यात 57 उमेदवारांना ऑल इंडिया रँक मिळाली मात्र गुण देताना अनियमितता झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी देखील नीट परीक्षेच्या निकालाबद्दल संताप व्यक्त करताना , ‘ अटीतटीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा मेहनत करत अनेक विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय NEET परीक्षेसाठी तयारी करतात… त्यात होणारा गैरप्रकार म्हणजे देशाच्या युवा भविष्याची फसवणूकच! लाखो मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे… किमान तिथे तरी प्रामाणिकता राहू दे ‘ असे म्हटलेले आहे.