आईने लाडक्या कुत्र्याच्या पिल्लाचा जीव घेतला म्हणून.., महाराष्ट्रातील घटना

शेअर करा

महाराष्ट्रातील अत्यंत दुर्दैवी अशी घटना छत्रपती संभाजीनगर इथे समोर आलेली असून मुलाला मोबाईलचे व्यसन लागलेले कमी व्हावे म्हणून घरात पाळीव कुत्रा आणण्यात आला मात्र त्याला रस्त्यावर घेऊन जाऊ नको इतके आईने सांगितले आणि त्यानंतर आईने कुत्र्याला मारून टाकले त्यामुळे 14 वर्षाच्या मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , राजवीर राहुल गडकर ( वय 14 ) असे मयत मुलाचे नाव असून शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. सदर कुटुंबीय मिल कॉर्नर रोडवर राहिला असून तिथे त्यांचे किराणा दुकान आहे. नववीत शिकणारा राजवीर हा मोबाईलच्या आहारी गेलेला असल्याकारणाने घरच्यांनी त्याला मोबाईलचे व्यसन तोडण्यासाठी पाळीव कुत्रा आणलेला होता. कुत्र्याने घरात घाण केली म्हणून संतापाच्या भरात आईने कुत्र्याचा जीव घेतला हे मुलाने पाहिल्यानंतर त्याने टाहो फोडला. 

राजवीर रोज त्याच्यासोबत खेळत असायचा आणि त्याला फिरायला घेऊन जायचा . घर आणि दुकान मुख्य रस्त्यावर असल्याकारणाने अपघात नको म्हणून आईने त्याला आवाज देऊन कुत्र्याला रस्त्यावर घेऊन जाऊ नको असे सांगितले होते त्याचाही त्याला राग आला आणि त्याने आपल्या खोलीत जाऊन गळफास घेतला. क्रांती चौक पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत . 


शेअर करा