‘ आत्मा अमर असतो तो तुम्हाला सोडणार नाही ‘,  शरद पवारांनी मोदींना ठणकावलं 

शेअर करा

नगर येथील राष्ट्रवादीच्या रौप्य महोत्सव सोहळ्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केलेली असून,’ पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनाधार नसताना देखील त्यांनी सरकार स्थापन केलेले आहे. त्यांना न शोभणारी मंगळसूत्र , म्हैस चोरून नेईल अशी भाषा मोदी यांनी वापरत माझ्यावर भटकती आत्मा अशी टीका केलेली आहे. आत्मा अमर असतो तो तुम्हाला सोडणार नाही ,’  अशा शब्दात मोदींना ठणकावले आहे. 

शरद पवार म्हणाले की ,’ आगामी काळात महाराष्ट्रासोबत हरियाणा आणि झारखंडमध्ये निवडणुका आहेत त्या जिंकायच्या आहेत. राष्ट्रवादी पक्ष सर्वांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे हा विश्वास लोकांना द्यावा लागेल.’ 

नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की ,’ मला निलेश लंके यांची चिंता आहे. ते दिल्लीला गेल्यावर काय करतील याचा नेम नाही. संसदेत मराठीत बोलले तरी चालते पण आपली लंके काय बोलतील हे सांगता येणार नाही. त्यांच्याकडे पाहून मला आमचे जुने लोक विचारतील हा कोण आणलाय ?. त्यांना काय माहिती हा कोण आहे ‘ अशी देखील मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी केलेली आहे.


शेअर करा