खासदार निलेश लंके म्हणाले की , ‘ लोकसभा फक्त ट्रेलर होता अजून.. ‘ 

शेअर करा

नगर येथील न्यू आर्ट्स कॉलेजच्या मैदानावर झालेल्या राष्ट्रवादीच्या रौप्य महोत्सव सोहळ्यात बोलताना निलेश लंके यांनी, ‘ नगर जिल्ह्यातील बाराही जागा जिंकणार ‘ असा निर्धार व्यक्त केलेला आहे. राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये या मेळाव्यानंतर नवचैतन्य निर्माण झालेले असून खासदार निलेश लंके काय बोलणार याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. 

निलेश लंके म्हणाले की ,’ लोकसभा ट्रेलर होता विधानसभेचा पिक्चर अजून बाकी आहे. आता मुंबईवरच आपला झेंडा फडकणार आहे . पवार इज द पावर.. सगळ्यांचा नाद करायचा पण पवार साहेबांचा नाद करायचा नाही. साहेबांचा नाद करणाऱ्या भल्याभल्यांना घरी पाठवण्यात आले आहे. 

निलेश लंके पुढे म्हणाले की, ‘ कांदा निर्यात बंदी आणि दूध दरवाढीबद्दल आत्ताच आंदोलन करायचे होते पण साहेब म्हणाले थोडी कळ काढ दिल्लीत जाऊन ये आणि मग आंदोलन कर. आता दिल्लीत जाऊन आलो की लगेच आपण लढाई सुरू करणार आहोत.’ 

खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील , ‘ यावेळी हातातलं सगळं संपलं असं वाटत होतं पण आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा जिंकून दाखवलं. लोकसभेला आपण चांगली कामगिरी केली आहे. लोकसभा तो झाकी हे विधानसभा बाकी है ,’ असे ते यावेळी म्हटले आहेत. 


शेअर करा