एकीकडे कार्यसम्राट (?) संग्राम जगताप यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स तर दुसरीकडे…

शेअर करा

नगर शहरात काल रात्री झालेल्या पावसानंतर रस्त्याची प्रचंड दुर्दशा झालेली असून दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात फ्लेक्सची जाहिरात करण्यात आलेली आहे.  संग्राम जगताप यांचा त्यांचे समर्थक कार्यसम्राट म्हणून उल्लेख करतात तर दुसरीकडे ज्या ठिकाणी कार्यसम्राट म्हणून फ्लेक्स लावलेले आहेत त्याच परिसरात झालेली रस्त्याची दुर्दशा देखील कथित कार्यसम्राटांच्या कारभाराचा परिचय नगरकरांना देत आहे.

अहमदनगर महापालिकेच्या अनेक उपनगरात रस्त्यांची अशीच परिस्थिती झालेली असून अवघ्या काही तासांच्या पावसात रस्त्यांची झालेली दुर्दशा ही महापालिकेच्या कामाची देखील पोलखोल करत आहे. अहमदनगर महापालिकेतील अनेक कामांची टेंडर ठराविक व्यक्तींनाच दिली जातात आणि त्यातील कथित टक्केवारी संबंधित अधिकारी तसेच लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचते आणि त्यातून झालेली रस्त्यांची अशी परिस्थिती नगरकरांच्या संतापाचे कारण ठरलेली असतानाच अशी पोस्टर्स नागरिकांच्या रोषाचे कारण ठरत आहेत . 

अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काही महिन्यांपूर्वीच महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या कामाची पोलखोल करण्यात आलेली होती.  सदर प्रकरणी बनावट ऑडिट रिपोर्ट सादर करून महापालिकेकडून बिले उकळण्यात आली त्यावेळी अक्षरशः बनावट शिक्क्यांचा देखील वापर करण्यात आल्याची बाब समोर आलेली होती त्या प्रकरणात पुढे काय झाले हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. 

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात सुजय विखे यांच्या पराभवासाठी संग्राम जगताप शिवाजी कर्डिले आणि भानुदास कोतकर यांच्या समर्थकांचे जोरदार शक्ती प्रदर्शन कारणीभूत ठरले असा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे. सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज भरतेवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वरील तीनही लोकप्रतिनिधींच्या समर्थकांकडून सुजय विखे यांचा परमनंट खासदार असा उल्लेख करण्यात आलेला होता. लोकशाहीत कोणीच लोकप्रतिनिधी परमनंट नाही असे असताना सुजय विखे यांचे हे पोस्टर सोशल मीडियात चर्चेला निमित्त ठरले आणि त्यानंतर नगरमध्ये इतिहास घडला. संग्राम जगताप आणि त्यांच्या समर्थकांनी नगरकरांची मानपाठ एक करणाऱ्या रस्त्यांच्या दुर्दशेकडे तातडीने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. 


शेअर करा