नगरमधील सावेडी परिसरात तरुणाचं टोकाचं पाऊल , तोफखान्यात अकस्मात मृत्यूची नोंद

शेअर करा

नगर येथे एक दुर्दैवी घटना समोर आलेली असून सावेडी उपनगरातील एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केलेला आहे. तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. 

उपलब्ध माहितीनुसार , श्रीकांत मच्छिंद्र कोहक ( वय 19 वर्ष राहणार आदित्य कॉलनी सावेडी )  असे मयत तरुणाचे नाव असून त्याने त्याच्या राहत्या घरी सात तारखेला शुक्रवारी गळफास घेतला. नातेवाईकांना ही माहिती समजताच त्याला रात्री पावणे दहाच्या सुमारास एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. 

तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे , पोलीस अंमलदार प्रदीप बडे यांनी त्यानंतर तात्काळ घटनास्थळी भेट दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे . 


शेअर करा