गौरी गडाख यांच्या मृत्यूबाबत झाला मोठा खुलासा, पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

शेअर करा

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख (वय 38) यांनी 7 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली आहे. गौरी यांचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला होता. गौरी गडाख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून त्यांचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. गळफास का घेतला ? याबद्दल काही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

गौरी यांच्या पार्थिवाचं औरंगाबादमध्ये पोस्टमार्टम करण्यात आले आणि त्यानंतर सोनई इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर अद्याप त्यांच्या मृत्यूसंदर्भात कोणी तक्रार दिलेली नसल्याचे समजते . There was a big revelation about the death of Gauri Gadakh

अप्पर पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल यांनी दिलेली माहिती अशी की, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची सून आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख यांचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला होता. शनिवारी सायंकाळी 6 च्या सुमारास त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गौरी या ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आणि जल संधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत यांच्या पत्नी होत. तर राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयी होत्या. गौरी यांचे माहेर लोणी (ता. राहाता) येथील आहे. त्या थेट राजकारणात सक्रीय नसल्या तरी पती प्रशांत यांनी स्थापन केलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्या कार्यरत होत्या.


शेअर करा