नगर जिल्ह्यात संगमनेर इथे एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा एका मनोरुग्ण महिलेवर अत्याचाराचे प्रकरण 11 तारखेला समोर आलेले आहे. पीडित महिलेच्या कुटुंबीयांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर महिलेच्या भावाने संगमनेर शहर पोलिसात धाव घेतली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, प्रकाश रामनरेश निषाद असे आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथे रहिवासी असून सध्या पुण्यात राहतो . पीडित 42 वर्षीय मनोरुग्न महिला घरात एकटी असल्याचे पाहून त्याने प्रवेश केला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याची माहिती आहे .