टोळधाडीत देखील संधी .. टोळ पकडून रग्गड पैसे कमावण्याचा बिजिनेस ?

शेअर करा

टोळ हल्ल्यापासून फक्त पाकिस्तानच नव्हे तर भारतातही बर्‍याच राज्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. अलीकडेच पाकिस्तानातून भारतात घुसलेल्या टोळांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील पिकांना लक्ष्य केले आहे महाराष्ट्रात देखील टोळ धाडीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे . मात्र पाकिस्तानने ह्या टोळ धाडीचा वापर करून पैसे कमावण्याचा मार्ग शोधला आहे . टोळ धाडीमधील टोळ पकडून या टोळांपासून पोल्ट्री फीड बनवण्याची अशी ही संकल्पना आहे .

पंतप्रधान इमरान खान म्हणाले की, टोळ पकडण्यासाठी देशव्यापी पायलट प्रकल्प तयार करणार आहोत, यात टोळांना पकडून देणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे दिले जातील. या योजनेमुळे देशातील काही गरीब भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल. टोळांपासून पॉल्टी फार्मसाठी प्रथिनेयुक्त असलेले पोल्ट्री फीड बनवले जाईल.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात आहेत त्यामुळे नागरिकांवर अन्नधान्याचे मोठे संकट आहे . सुरुवातीला हा पायलट प्रोजेक्ट पंजाब प्रांतातील ओकरा येथे लागू करणार आहे. शेतकऱ्यांना त्यासाठी २० रुपये किलो या भावाने पैसे दिले जाणार आहेत. वाळवंटातील टोळ हे समूहात असताना त्यांचे वर्तन बदलतात. टोळ एका तासामध्ये १६ ते १९ किमी अंतर अंतर करू शकतात. वाऱ्यामुळे ते आणखी दूर जाऊ शकतात. एक किलोमीटर टोळाच्या समुहात सुमारे ४ कोटी टोळ असतात. एका दिवसात ३५ हजार लोक जेवतील इतकी ते पिक खातात त्यामुळे माणसांचे अन्नधान्य जर टोळ फस्त करणार असतील तर मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे संकट देशापुढे उभे राहू शकते . पाकिस्तानचा प्रोजेक्ट कितपत यशस्वी होईल हे येणारा काळच ठरवील.

संबंधित बातम्या

भाडेकरू म्हणून आली अन मालकीण बनली पण तरीदेखील होता पैशांचा हव्यास : उचलले धक्कादायक पाऊल
https://nagarchaufer.com/?p=198

लॉकडाऊनमुळे भावी पतीचा विरह सहन होत नसल्याने नवरीने पायी गाठले भावी पतीचे घर : पुढे काय झाले ?
https://nagarchaufer.com/?p=80

एका मुलीची आई अविवाहित युवकाच्या प्रेमात, नवरा सोडून धरला प्रियकर मात्र ? : महाराष्ट्रातील बातमी
https://nagarchaufer.com/?p=239

लग्न झाल्यावर चारच दिवसात नववधू गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघड : महाराष्ट्रातील बातमी
https://nagarchaufer.com/?p=264

प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत मुलाने रंगेहाथ पाहिल्याने आईने बनवला मास्टरप्लॅन मात्र ..
https://nagarchaufer.com/?p=317


शेअर करा