एक्स गर्लफ्रेंडचा फोटो व्हाटसअपला ठेवून म्हणाला ” कलियुगाची द्रौपदी ” मग मात्र…: पुढे काय झाले ?

  • by

प्रेमप्रकरणात कटुता एकदा आली की वाढतच जाते मात्र त्यातून एकमेकांच्या बदनामीचे देखील प्रकार हल्ली सर्रास केले जातात अशातच एका तरुणाचे ब्रेकअप होताच त्याने चक्क त्याच्या व्हाट्सएप्प स्टेटसला प्रेयसीचा डीपी ठेवला आणि त्यावर ‘ कलियुगाची द्रौपदी ‘ असे लिहलेले होते . प्रेयसीच्या हे लक्षात येताच पोलिसात तक्रार दाखल झाली आणि या प्रियकराला पोलीस कोठडीची हवा खावी लागली. बातमी गुजरातच्या राजकोटची आहे .

उपलब्ध माहितीनुसार, प्रेयसीसोबतच्या ब्रेकअपनंतर एका व्यक्तीने एक्स गर्लफ्रेंडच्या फोटोवर कलियुगाची द्रौपदी लिहिले आणि तो फोटो मोबाईल डीपीवर ठेवला. मुलीने हा डीपी पाहिल्यावर तिने या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे.पीडित मुलगी ही गुजरातच्या राजकोट येथे राहते. हितेष नावाच्या मुलासोबत तिचे काही दिवसांपूर्वी प्रेमसबंध जुळले होते. राजकोटमध्येच या दोघांचे अफेअर सुरु झाले मात्र थोड्याच दिवसांत त्यांच्यातील प्रेमसंबंध उघडले आणि दोघांत कटुता आली.

प्रियकर पीडितेला सतत त्रास देऊ लागला. त्यामुळे प्रेयसीने हे नातं कायमचं तोडलं त्यानंतरही प्रियकर प्रेयसीला अधिकच त्रास देऊ लागला. प्रेयसीने प्रियकराला बऱ्याचदा समजावून सांगितले. पण तो ऐकत नव्हता. अखेर प्रियकराने तिची सोशल मीडियावरून बदनामी करायला सुरूवात केली. प्रियकराने प्रेयसीचा फोटो Whats Appवर अपलोड करून तिची बदनामी केली.

‘कलियुगाची द्रौपदी’ असं म्हणून प्रियकराने प्रेयसीचा फोटो आपल्या Whats App डिपीवर अपलोड केला. त्याचबरोबर तो प्रेयसीला Whats App वरून अश्लिल मेसेज आणि व्हिडिओ पाठवत होता. या संपूर्ण प्रकारामुळे पीडित तरुणी त्रस्त झाली होती. अखेर कंटाळून तिने प्रियकराच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे.