बाथरूमध्ये चक्क पतीने बसवला होता ‘ स्पाय कॅमेरा ‘ फोटो मिळताच म्हणाला की .. ?

  • by

पंजाबमधील लुधियानामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने घरातील बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा लावून पत्नीचे आक्षेपार्ह फोटो काढले. त्यानंतर तिला ब्लॅकमेल केले असे पत्नीचे म्हणणे आहे. पती आणि पत्नी हे वेगवेगळे रहात असून जेव्हा ते सोबत राहत होते तेव्हा त्याने हा प्रकार केल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे. प्रकार उघडकीस आल्यानंतर पत्नीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पीडित महिला २३ वर्षांची असून, ती सध्या तिच्या माहेरी राहते. तिने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ती जेव्हा पतीसोबत सासरी राहत होती, त्यावेळी पतीने घरातील बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा लावला होता. त्याद्वारे त्याने पत्नीचे काही आक्षेपार्ह फोटो काढले होते. यानंतर त्याने पत्नीला ब्लॅकमेल केले. त्याने तिच्याकडे २० लाख रुपयांची मागणी केली. जर पैसे दिले नाहीत, तर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

पतीने त्याच्या व्हाट्सएप्प स्टेटसवर याआधीच काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले आहेत, असेही तिने सांगितले. या प्रकरणात पतीची आई आणि काका हे देखील सामील असल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.