श्रीगोंदा रोडवर हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश , एका आरोपीसह दोन महिला धरल्या : कधी झाली कारवाई ?

शेअर करा

घरात चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले असून एका व्यक्तीसह दोन महिलांना अटक करण्यात आलेली आहे.श्रीगोंदा शहरातील काष्टी रोडच्या बाजूला सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली सेक्स रॅकेट चालवणारा मुख्य आरोपी अरुण देवकर याच्यासह पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. sex racket busted by shrigonda police ahmednagar district operated from home.

उपलब्ध माहितीनुसार, श्रीगोंदा शहराजवळील श्रीगोंदा काष्टी रस्त्यावरील फूट रस्ता परिसरात एका महिलेच्या घरी हा व्यवसाय सुरू होता. खबरींच्या मार्फत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मोबाईलच्या माध्यमातून सदर रॅकेट कार्यरत होते. मोबाईलवर आधी माहिती घेतल्यानंतर आंबट शौकीन ग्राहक त्या परिसरात यायचे आणि आणि त्यांच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरळीत सुरु होत चाललेला होता, मात्र पोलिसांना माहिती मिळताच विलंब न करता कारवाई करण्यात आल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांनी दिली.

राज्यात ठिकठिकाणी उच्चभ्रू वस्तीमध्ये देखील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश होण्याचा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील पुणे, नागपूर तसेच नगर येथील गुलमोहर रोड परिसरात देखील शहरात देखील अशा पद्धतीने सेक्स रॅकेट कार्यरत असल्याचे प्रकार या आधी देखील घडले आहेत. घरी व्यवसाय चालू असल्याने पोलिसांना देखील या गोष्टीची लवकर माहिती कळत नाही त्यामुळे फ्लॅट भाड्याने घेऊन त्याद्वारे असे व्यवसाय सुरू ठेवले जातात. फ्लॅट भाड्याने देणेआधी घरमालकांनी देखील जबाबदारीने काम करण्याची गरज आहे तरच असल्या अवैध व्यवसाय आळा बसू शकेल.

संबंधित बातमी : एकदा का त्याने स्पामध्ये एंट्री केली की पुढील ‘ मास्टरप्लॅन ‘ असायचा तयार : असे चालायचे रॅकेट ? ( October 22, 2020)

स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीचा पोळिणी नुकताच पर्दाफाश केला असून या प्रकरणी मोहम्मद जुनेद हबीबउल्ला शाह (२८, रा. गोंडा, उत्तर प्रदेश, हल्ली रा. अंधेरी, मुंबई) या ‘मॅनेजर’ला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकल्या आहेत . मंगळवारी रात्री त्याला अटक केली असून त्याच्या तावडीतून चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील सेवा रस्त्यावर असलेल्या ‘द बायके सूरज प्लाझा’ या हॉटेलमधील ‘इलिगंट स्पा अँड सलून’ मध्ये स्पाच्या नावाखाली काही तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने, उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके, जमादार राजू महाले आणि पोलीस हवालदार अविनाश बाबरेकर आदींच्या पथकाने हॉटेलच्या सातव्या मजल्यावरील या स्पामध्ये मंगळवारी सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.

बातमी मिळण्यानंतर छापा टाकण्याआधी पथकाने बनावट ग्राहक पाठवून या प्रकाराची खात्री केली. तिथे मागणीनुसार शरीरविक्रयासाठी मुली पुरविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. या बनावट ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी धाडसत्र राबविले. या कारवाईमध्ये स्पा चालविणारा मोहम्मद जुनेद हबीबउल्ला शाह या मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्या तावडीतून या चार मुलींची सुटकाही करण्यात आली आहे. शाह याच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

स्पामध्ये संपूर्ण बॉडी मसाजसाठी अडीच हजार रुपये एका ग्राहकाकडून घेतले जायचे तो एकदा आला कि त्याला आणखी खाणाखुणा करत आणखी स्पेशल मसाजसाठी खुणवले जायचे. यातही त्याने तयारी दर्शविली की त्याच्याकडून मोठी रक्कम उकळली जायची. यातील काही रक्कम या तरुणींना तर काही रक्कम ‘मॅनेजर’कडे वळती केली जात होती. बिनधास्तपणे सुरु असलेल्या या अनैतिक व्यवसायाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी हे धाडसत्र राबविले.


शेअर करा