एका शिक्षकाने आपल्या मुलीला धक्का दिला त्यामुळे ती खाली पडली आणि डोक्याला मार लागून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला अशी तक्रार न्यायालयात दाखल करण्यात आली होती त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी न्यायालयाने शिक्षकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे
उपलब्ध माहितीनुसार , सुनील दिगंबर हांडे ( वय 42 राहणार कोपरगाव ) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव असून एक एप्रिल 2018 रोजी फिर्यादी मयत मुलीच्या आईने न्यायालयात धाव घेतली होती. उमा दीपक भोसले असे फिर्यादी महिला यांचे नाव असून त्यांची मुलगी तृप्ती दीपक भोसले ( वय आठ ) हिचा शिक्षकाने धक्का दिल्यामुळे खाली पडून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला असा दावा तिच्या आईने केलेला होता.
तृप्ती ही पडेगाव इथे जिल्हा परिषद शाळेत शिकत होती. शाळेत उशीर झाल्याच्या कारणामुळे शिक्षकाने तिला रागावून धक्का दिला आणि त्यानंतर खाली पडल्याने तिच्या डोक्याला मार लागला आणि रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. शिक्षकाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून त्या न्यायालयाचे उंबरठे झिजवत होत्या त्यावर अखेर न्यायालयाने खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत.