हॉटेलच्या समोर बंद गाडीत ‘ मोठा व्यवहार ‘ दोन अटक दोन फरार : नेवासा फाटा इथे कारवाई

शेअर करा

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई दिल्ली यांच्यात अंतिम सामना झाला या सामन्यात मुंबईने बाजी मारली असली तरी या सामन्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या सट्टा बुकी वर नेवासा फाटा येथे पोलिसांनी बुधवारी दिनांक ११ तारखेला पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला याच्यामध्ये बारा लाख 72 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे तर दोन जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे तर दोन जण फरार झाले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, एम एच 17 सीएम 21 हे वाहन नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे वेगवेगळ्या पॉईंटवर थांबून आयपीएल नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनय त्यागी यांना दोन गुप्त सूत्रधारांना कडून समजले. त्यानुसार नेवासा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांच्या पथकाने सट्टा खेळणाऱ्या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बोरुडे, संतोष रंगनाथ गुंजाळ याला नेवासा फाटा येथील गुरुदत्त हॉटेल समोरून कारसह अटक केली. त्याच्याकडून 6 मोबाईल, मटका खेळण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 34 हजार 700 अशी मिळून आली आणि एकूण बारा लाख 72 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला

प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनय त्यागी यांनी मुंबई-दिल्ली अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर आकडे घेऊन बुकी किरण पोपट जाधव याला शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारला मात्र तो आढळून आला नाही मात्र त्याचे दोन पंटर पोलिसांनी गजाआड केले आहेत. आयपीएल बुकींचे मोठे रॅकेट नगर जिल्ह्यासह इतरत्र ठिकाणीदेखील फोफावले असून जास्त जनसंपर्क येणारी केंद्रे ही बुकिंग घेण्याचे अड्डे झालेले आहेत. गुप्त कोडच्या माध्यमातून काम करत असल्याने पोलिसांचे देखील काम अवघड झालेले आहे. पानाचे ठेले, सलून, हायवेवरील हॉटेल्स व नामांकित हाय प्रोफाईल मंडळींचा देखील या व्यवसायात सहभाग आहे. बुकींची समांतर यंत्रणा ही पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली असून त्यातून गुन्हेगारीचे देखील प्रकार याआधी घडलेले आहेत.


शेअर करा