पैशाचा पाऊस पाडायला कोपरगावला आलेला मांत्रिकच झाला गायब

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक अजब अशी घटना समोर आलेली असून कोपरगाव तालुक्यात कोकमठाण इथे पैशाचा पाऊस पाडण्यासाठी म्हणून आलेल्या एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आलेले आहे. कोपरगाव शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

उपलब्ध माहितीनुसार , दिलीप भिकाजी इंगळे असे पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा करणाऱ्या आणि अपहरण झालेल्या इसमाचे नाव असून अमोल जयसिंग राजपूत आणि इतर चार ते पाच जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दिलीप इंगळे याची पत्नी ज्योती इंगळे ( मूळ राहणार जिल्हा बुलढाणा ) यांनी याप्रकरणी बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर तो कोपरगाव शहर पोलिसात वर्ग करण्यात आलेला आहे. 

फिर्यादीमध्ये त्यांनी म्हटले आहे की , ‘ माझा पती  हा पैशाचा पाऊस पाडण्याचे काम करतो. 22 जून रोजी रात्री 10 च्या सुमारास तालुक्यातील कोकमठाण परिसरात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी तो गेलेला होता त्यावेळी आपल्या पतीचे अमोल राजपूत व इतर चार ते पाच जणांनी अपहरण केले आणि त्यानंतर त्याला कुठेतरी घेऊन गेले ‘.  कोपरगाव शहर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.


शेअर करा