लैंगिक छळाचा एक अत्यंत संतापजनक असा प्रकार नेवासा तालुक्यातील सोनई इथे समोर आलेला असून अत्याचार करतानाचे एक छायाचित्र काढले आणि त्याच्या आधारे ब्लॅकमेल करत पीडित महिलेला विवाह करण्यास भाग पाडले. आरोपीने त्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन इतर व्यक्तींसोबत देखील शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दमदाटी केली त्यानंतर पीडित महिलेने सोनई पोलिसात याप्रकरणी धाव घेतली आहे .
उपलब्ध माहितीनुसार दोन जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पीडित महिलेच्या पतीला अटक करण्यात आलेली आहे तर त्यातील तर या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे.
आरोपी हा अल्पसंख्यांक समुदायातील एक डॉक्टर असून त्याचा दुसरा मित्र अद्यापपर्यंत फरार आहे. आरोपीने काढलेल्या छायाचित्राचा वापर करत पीडित महिलेला लग्न करण्यास भाग पाडले आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात तिला घेऊन गेला . 2023 पासून तिच्यासोबत अशाच पद्धतीने छळ सुरू होता त्यानंतर तिने सोनई पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल केला.