नगर शहराजवळ लुटमारीचा एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून एका वाहनचालकाला मारहाण आणि शिवीगाळ करत त्याच्याकडील केबल आणि बॅटरी असा 9000 चा ऐवज लंपास करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , शेंडी चौकात ही घटना घडली असून याप्रकरणी करण गुंड ( वय 24 वर्ष राहणार शेंडी ) यांनी एमआयडीसी पोलिसात दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात केलेला आहे. किरण भगत आणि एका अनोख्या व्यक्तीवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.