13 जुलैनंतर 288 पैकी कुणाला निवडून आणायचे की पाडायचे याचा निर्णय घेणार असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेले होते त्यानंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यात ज्यांच्या नोंदी सापडलेले आहेत त्यांना तसेच त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजे. नोंद न सापडलेले काही मराठे यामुळे प्रमाणपत्रापासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात मागेल त्या मराठ्याला सरकारने कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी केलेली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की ,’ मराठा आणि ओबीसी यांच्या दंगल घडवण्याचा छगन भुजबळ यांचा डाव होता मात्र मराठा समाजाने तो हाणून पाडलेला आहे. छगन भुजबळ यांनी सर्व ओबीसी नेत्यांना मराठ्यांच्या विरोधात एकत्र आणलेले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे बळ असून गिरीश महाजन हे सगेसोयऱ्याचे प्रमाणपत्र टिकणार नाही असे सांगत आहेत, असे असेल तर अंतरवाली सराटी इथे आरक्षणाचे अभ्यासक आणि आयोगाचे अधिकारी कशाला आणले होते ?. खोटी माहिती देऊन समाजात गैरसमज पसरू नका मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांचा आम्ही कार्यक्रम करू,’ असेही ते पुढे म्हणाले.