डॉक्टर पंकज जावळे यांचा जामीन फेटाळताना न्यायालयाने म्हटलं की ..

शेअर करा

डॉक्टर पंकज जावळे यांचा जामीन फेटाळताना न्यायालयाने म्हटलं की

अहमदनगर महापालिकेचे फरार तत्कालीन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन अहमदनगर जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावलेला असून बुधवारी सुमारे दीड तास झालेल्या युक्तिवादानंतर संध्याकाळी जिल्हा न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांनी आदेश जाहीर केलेला आहे. डॉक्टर पंकज जावळे यांचा जामीन फेटाळताना न्यायालयाने म्हटलं की पंकज जावळे मोठ्या पदावर कार्यरत आहेत त्यामुळे त्यांना जामीन मंजूर केल्यास ते कनिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणून स्वतः बचावाचा प्रयत्न करतील. 

बांधकाम परवानगीसाठी आठ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असून त्यानंतर पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय सहायक शेखर देशपांडे हे सध्या फरार झालेले आहेत. एडवोकेट सतीश गुगळे यांच्यामार्फत पंकज जावळे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. 

ऍडव्होकेट अभिजीत पुप्पाल यांनी फिर्यादी व्यक्ती यांच्यामार्फत युक्तिवाद केला त्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीने देखील एडवोकेट अनिल घोडके यांनी युक्तिवाद करत अटकपूर्व जामीन नामंजूर करावा अशी मागणी केली. पंकज जावळे यांचा गुन्ह्यामधील सहभाग स्पष्ट झालेला असून त्यांचा मोबाईल फोन हस्तगत करून त्याचा तपास करायचा आहे त्यांना या ट्रॅपची माहिती कुणाकडून मिळाली त्यात आणखीन कोण सहभागी आहे याचा तपास करण्याच्या उद्देशाने हा अर्ज नामंजूर करण्यात यावा अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली होती.

पंकज जावळे यांचे वकील सतीश गुगळे यांनी काय केला युक्तिवाद ?

आरोपी तथा अर्जदार पंकज जावळे यांचे वकील यांचे ऍडव्होकेट सतीश गुगळे यांनी , ‘ नगर महापालिकेत नवीन आयुक्त रुजू झालेले आहेत त्यामुळे जावळे आता महापालिकेत हस्तक्षेप करू शकत नाहीत. 19 जूनला पैशांची मागणी नोंदविण्यात आली रक्कमही निश्चित झाली त्यामुळे पुन्हा २० जूनला व्हेरिफिकेशन करण्याची गरज काय ?. जावळे यांच्या विरोधात पुरावा तयार करण्याचा किंवा त्यांना प्रकरणात अडकवण्याचा उद्देश यामुळे स्पष्ट होतो त्यात देखील पंकज जावळे यांनी बोलताना बोलून घ्या असे म्हटलेले आहे मात्र त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. फाईल मंजूर झालेली असताना देखील फिर्यादी यांनी पैशाचा विषय काढला त्यावेळी जावळे यांनी तुमची फाईल मंजूर झालेली आहे विषय संपला आहे असे सांगितले आणि त्यानंतर  शेखर देशपांडे हे सुट्टीवर गेले आणि आयुक्त इथेच होते त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी कोणतेही कारण नाही. ते तपासाला उपलब्ध होऊ शकतात असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. 

डॉक्टर पंकज जावळे यांचा जामीन फेटाळताना न्यायालयाने म्हटलं की , पंकज जावळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर हजर व्हावे आणि तपासासाठी सहकार्य करावे. जर ते दोषी नसतील तर न्याय प्रक्रियेपासून का पळाले ?  जावळे यांनी सिस्टीममध्ये लूप हॉल्स शोधून स्वतः खोट्या भोळ्यापणाचा खोटा आव आणलेला आहे. जर पंकज जावळे यांना जामीन मंजूर झाला तर ते कनिष्ठ अधिकारी यांच्यावर दबाव आणून कायदेशीर कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करतील तसेच त्यांच्या स्वातंत्र्याचा वापर करत इतर शासकीय अधिकारी इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील दबाव आणतील त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे असे म्हटलेले आहे . 


शेअर करा