वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रसोबत नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असून पूजा खेडकर यांनी अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून हे प्रमाणपत्र घेतलेले आहे का ? याची पडताळणी सुरू आहे. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र आर्थिक तडजोडी करून दिले जात असल्याचे आरोप यापूर्वी देखील झालेले आहेत.
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे सेवानिवृत्त अधिकारी असून पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील ते रहिवासी आहेत. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळात उच्चस्तरीय पदावर ते यापूर्वी कार्यरत होते. निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी त्यांचे उत्पन्न सुमारे 40 कोटी असल्याचे म्हटलेले होते मात्र पूजा खेडकर यांनी अशाही परिस्थितीत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळवले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलीप खेडकर यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघा निवडणूक लढवली आणि त्यात त्यांना अवघी 13749 मते मिळाली.
पूजा खेडकर यांनी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असून पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून ट्रेनिंगसाठी त्यांची नियुक्ती झाली होती मात्र त्यानंतर खाजगी वाहनावर लाल दिवा लावणे , भारत सरकारचे स्टीकर लावणे असे अनेक प्रकार त्यांनी केले . पूजा खेडकर यांना सध्या यांची सध्या वाशिममध्ये नियुक्ती झालेली असून सरकारी यंत्रणा पोखरण्याचा एक उत्तम नमुना म्हणून याकडे पाहता येईल.