पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सातत्याने , पत्नीचे टोकाचं पाऊल 

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून स्वतःच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सातत्याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने अखेर टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केलेली आहे. श्रीरामपूर शहरातील ही घटना आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , मयत व्यक्तीची पत्नी पूजा हिला तिचा पती जावेद शेरखान पठाण हा सातत्याने चारित्र्यावर संशय घेऊन छळत असायचा. आरोपी जावेद हा त्याची मुलगी शिफा हिला घेऊन मुंबईला बहिणीकडे निघून गेला आणि पूजा हिला मुलीची भेट घेऊ देत नव्हता. 

आरोपी सातत्याने तिला मी दुसरे लग्न करणार असून तुला तुझी मुलगी शिफा हिला कधीही भेटू देणार नाही अशी सातत्याने धमकी देत तिचा छळ करत असायचा यामुळे पूजा अस्वस्थ झालेली होती आणि तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा हिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनंतर आरोपी जावेद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


शेअर करा