40 कोटींची संपत्ती असताना ‘ नॉन क्रिमीलेअर ‘ काढणाऱ्या दिलीप खेडकर यांना नगर दक्षिणला मते किती मिळाली ?

शेअर करा

40 कोटींची संपत्ती असताना ‘ नॉन क्रिमीलेअर ‘ काढणाऱ्या दिलीप खेडकर यांना नगर दक्षिणला मते किती मिळाली ?

देशात वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रसोबत नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असून पूजा खेडकर यांनी अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून हे प्रमाणपत्र घेतलेले आहे का ?  याची पडताळणी सुरू आहे.  40 कोटींची संपत्ती असताना ‘ नॉन क्रिमीलेअर ‘ काढणाऱ्या दिलीप खेडकर यांना नगर दक्षिणला मते किती मिळाली हे पाहिले तर आपणही चकित झाल्याशिवाय राहणार नाही. 

पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे सेवानिवृत्त अधिकारी असून पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील ते रहिवासी आहेत. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळात उच्चस्तरीय पदावर ते यापूर्वी कार्यरत होते. निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी त्यांचे उत्पन्न सुमारे 40 कोटी असल्याचे त्यांनी निवडणूक प्रमाणपत्र देताना म्हटले होते मात्र पूजा खेडकर यांनी अशाही परिस्थितीत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळवले. 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलीप खेडकर यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघा निवडणूक लढवली आणि त्यात त्यांना अवघी 13749 मते मिळाली. माय नेता डॉट इन्फो वेबसाईट वरील माहितीनुसार दिलीप खेडकर यांनी त्यांची वैयक्तिक संपत्ती 40 कोटी असल्याचे घोषित केले होते सोबतच लायबिलिटी शून्य असल्याचे देखील त्यांनी प्रमाणपत्रात म्हटलेले होते. दिलीप कोंडीबा खेडकर असे त्यांचे पूर्ण नाव आहे . 2021 – 2022 मध्ये त्यांनी उत्पन्न तेरा लाख ५८ हजार दाखवले तर 2022 – 2023 मध्ये तिपटीपेक्षा जास्त वाढ होऊन त्यांचे उत्पन्न ४३ लाख ५९ हजार झाले. 

40 कोटी रुपयांची संपत्ती असताना स्वतःच्या मुलीला नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळवून देणारे दिलीप खेडकर धन्य आहेत.  एकीकडे गोरगरिबांची मुले यांना शिक्षणात सवलत मिळावी म्हणून नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट गरजेचे असते मात्र 40 कोटींची प्रॉपर्टी असून देखील स्वतःला नॉन क्रिमीलेअरमध्ये सामील करून घेणाऱ्या दिलीप खेडकर यांचा हा कारनामा या निमित्ताने समोर आलेला आहे. 

पूजा खेडकर यांनी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असून पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून ट्रेनिंगसाठी त्यांची नियुक्ती झाली होती मात्र त्यानंतर खाजगी वाहनावर लाल दिवा लावणे , भारत सरकारचे स्टीकर लावणे असे अनेक प्रकार त्यांनी केले . पूजा खेडकर यांना सध्या यांची सध्या वाशिममध्ये नियुक्ती झालेली असून नियुक्ती यंत्रणा पोखरण्याचा एक उत्तम नमुना म्हणून याकडे पाहता येईल.


शेअर करा