नगरमध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून भावाला जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणीवर अत्याचार करण्यात आलेला आहे. नगर शहरातील एका उपनगरात हा प्रकार घडलेला असून पीडित तरुणीही सध्या शिक्षण घेत आहे. बोल्हेगावमधील एका खोलीत धमकी देऊन अत्याचार केल्याचे पीडित तरुणीचे म्हणणे आहे.
नगर शहरातील एका उपनगरात पीडित तरुणी राहत असून आरोपी गौरव जगधने ( राहणार गांधीनगर बोल्हेगाव याच्या विरोधात तिने तोफखाना पोलिसात फिर्याद दिलेली आहे. आरोपीने बोल्हेगाव इथे एका खोलीत घेऊन जात आपल्यावर अत्याचार केला असे तिचे म्हणणे आहे.
तरुणीच्या म्हणण्यानुसार जर याविषयी तू कुणाला काही सांगितले तर तुझ्या भावाला जिवंत ठेवणार नाही अशी त्याने धमकी दिली आणि तिला मारहाण देखील केली. आरोपीचा त्रास असह्य होत असल्याने अखेर तिने पोलिसात धाव घेतली आहे .