एका व्यावसायिकाला तब्बल 11 सावकारांनी विळखा घातल्याने अखेर टोकाचे पाऊल

शेअर करा

एका व्यावसायिकाला तब्बल 11 सावकारांनी विळखा घातल्याने अखेर टोकाचे पाऊल

खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून किराणा व्यावसायिकाने अखेर टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा इथे समोर आलेली असून किराणा दुकानदार यांनी तब्बल 11 सावकारांकडून व्यावसायिक आणि कौटुंबिक अडचण असल्याकारणाने कर्ज घेतले होते. एका व्यावसायिकाला तब्बल 11 सावकारांनी विळखा घातल्याने अखेर टोकाचे पाऊल उचलत त्यांनी प्राण गमावलेले आहेत

उपलब्ध माहितीनुसार , किरण सुरेश कुलकर्णी ( वय 48 वर्षे ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी कोरेगाव भीमा , लोणीकंद , वाघोली , जातेगाव खुर्द येथील विविध सावकारांची नावे लिहून त्यांचा व्याजदर देखील लिहून ठेवलेला असल्याने तब्बल किती टक्के व्याजाने हे सावकार पैसे देत होते हे देखील समोर आलेले आहे. 

वैष्णवी सुपर मार्केट नावाने कुलकर्णी हे किराणा दुकान चालवत होते. कोरोना काळात अडचण आल्यानंतर त्यांनी सावकाराकडून पैसे घेण्यास सुरुवात केले आणि एका सावकाराचे फेडण्यासाठी दुसऱ्याकडून असे करत सावकारांचीच संख्या जवळपास 11 झाली होती. 

सर्व सावकारांकडून पैशासाठी त्यांचा छळ सुरू झाल्यानंतर त्यांनी यातून बाहेर घेण्याचा देखील प्रयत्न केला मात्र त्यात सातत्याने अपयश येत असल्याने न्हावी सांडस येथील भीमा नदीत उडी मारून टोकाचे पाऊल उचलले. 

नवनाथ भंडारे , संतोष भंडारे , संदीप आरगडे , सुधाकर ढेरंगे , कांतीलाल ढेरंगे , अमोल गव्हाणे ,शांताराम सावंत ,अजय यादव ,जनार्दन वाळुंज ,किशोर खळतकर ,मामा सातव अशी गुन्हा दाखल झालेल्या खाजगी सावकारांची नावे आहेत.


शेअर करा