पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई झाल्याने सगळीच फाईल आता उघडणार का ? 

शेअर करा

वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांचे वाशिम जिल्ह्यातील प्रशिक्षण तात्काळ थांबवण्यात आलेले आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने हा आदेश काढलेला असून 16 तारखेला संध्याकाळी पूजा खेडकर यांना या आदेशाची प्रत सुपूर्द करण्यात आलेली आहे. पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई झाल्याने सगळीच फाईल आता उघडणार का ? हे येत्या काळात पाहावे लागेल. 

पूजा खेडकर यांना मसूरी येथील प्रशिक्षण संस्थेत 23 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश आहेत. खाजगी गाडीवर अंबर दिवा लावला त्यावर महाराष्ट्र शासन लिहिले त्या संदर्भात सातत्याने वाद  केले त्यानंतर पूजा खेडकर या चर्चेत आल्या आणि त्यांच्या नेमणुकीपर्यंतची सर्वच फाईल उघडण्यात आली. 

पूजा खेडकर यांचे वडील आधी प्रदूषण महामंडळात वरिष्ठ पदावर कार्यरत होते त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळी स्वतःची संपत्ती 40 कोटी असल्याचे सांगितले होते सोबतच लायबिलिटी शून्य असल्याचे देखील सांगितले होते अशी परिस्थिती असताना देखील पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळवले. पूजा खेडकर यांचे दिव्यांग सर्टिफिकेट देखील आता वादात सापडलेले आहे . 

आयएएस सारख्या उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याची मानसिक स्थिती व्यवस्थित नसेल तर हा अधिकारी कुठल्या निकषातून या पदावर बसण्यासाठी कार्यरत राहतो ? . मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या अशा व्यक्तींच्या हाती जर इतक्या मोठ्या पदाचा कारभार देण्यात आला तर प्रतिकूल परिस्थितीत काय होईल याची कल्पनाही करवत नाही. 


शेअर करा