…. तर व्हाट्सएप्प स्टेटसला रोज नवीन महिलांचे फोटो ठेवण्याचे ‘ हे ‘ होते सिक्रेट : पोलिसही हैराण

शेअर करा

नगर जिल्ह्यात तीन-चार दिवसांपूर्वी श्रीगोंदा येथे एका घरामध्ये चाललेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता श्रीगोंदा येथील सेक्स रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी हा स्वतःच्या व्हाट्सअप स्टेटस ला महिलांचे फोटो ठेवत होता, त्याने ही शक्कल बड्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लढवण्याचे आत्तापर्यंतच्या पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकाराला गती दिली असून या प्रकरणात आणखी काही पुढे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

श्रीगोंदा येथील सेक्स रॅकेटची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी अरुण देवकर याच्या विरोधात भा द वि कलम 370 अन्वये कारवाई केली आहे. तपास सुरू असून रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. सेक्स रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी स्वतःच्या व्हाट्सअप स्टेटस ला महिलांचे फोटो ठेवायच, त्याने ही शक्कल बड्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लढवली होती. एका नागरिकाने अरुण देवकर याच्या मोबाईल स्टेटसचे स्क्रीनशॉट काढून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठवले होते. पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना हे स्क्रीन शॉट पाठवले त्यानुसार दौलतराव जाधव यांनी अरुण देवकर याच्यासह दोन महिलांना अटक केली.

काही ग्राहकांनी अरुण देवकर याने महिलांचे ठेवलेले व्हाट्सअप स्टेटस पाहून त्याच्याशी संपर्क साधण्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. महिलांचे फोटो पाहून ग्राहक देवकर याच्याशी संपर्क साधत होते. सातत्याने फोटो बदलत रोज नवनवीन फोटो तो व्हॉट्सअप प्रोफाइलला ठेवत असे आणि अप्रत्यक्षपणे त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या महिलांची माहिती यातून ग्राहकांना समजत असे आणि ग्राहक त्याच्याशी संपर्क साधत असत. या सेक्स रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याबाबत पोलिस प्रशासन तपास करत आहे श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील अनेक बडे मासे याप्रकरणात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .

काय आहे प्रकरण ?

११ नोव्हेंबर रोजी घरात चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले होते आणि एका व्यक्तीसह दोन महिलांना अटक करण्यात आलेली आहे.श्रीगोंदा शहरातील काष्टी रोडच्या बाजूला सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली सेक्स रॅकेट चालवणारा मुख्य आरोपी अरुण देवकर याच्यासह पोलिसांनी दोन महिलांना अटक केली होती . पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली होती.

श्रीगोंदा शहराजवळील श्रीगोंदा काष्टी रस्त्यावरील फूट रस्ता परिसरात एका महिलेच्या घरी हा व्यवसाय सुरू होता. खबरींच्या मार्फत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला . मोबाईलच्या माध्यमातून सदर रॅकेट कार्यरत होते. मोबाईलवर आधी माहिती घेतल्यानंतर आंबट शौकीन ग्राहक त्या परिसरात यायचे आणि आणि त्यांच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरळीत सुरु होत चाललेला होता, मात्र पोलिसांना माहिती मिळताच विलंब न करता कारवाई करण्यात आल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांनी दिली होती.

राज्यात ठिकठिकाणी उच्चभ्रू वस्तीमध्ये देखील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश होण्याचा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील पुणे, नागपूर तसेच नगर येथील गुलमोहर रोड परिसरात देखील शहरात देखील अशा पद्धतीने सेक्स रॅकेट कार्यरत असल्याचे प्रकार या आधी देखील घडले आहेत. घरी व्यवसाय चालू असल्याने पोलिसांना देखील या गोष्टीची लवकर माहिती कळत नाही त्यामुळे फ्लॅट भाड्याने घेऊन त्याद्वारे असे व्यवसाय सुरू ठेवले जातात. फ्लॅट भाड्याने देणेआधी घरमालकांनी देखील जबाबदारीने काम करण्याची गरज आहे तरच असल्या अवैध व्यवसाय आळा बसू शकेल.


शेअर करा