पत्नी रक्तबंबाळ झाल्याचे लक्षात येताच आरोपीने

शेअर करा

पत्नी रक्तबंबाळ झाल्याचे लक्षात येताच आरोपीने

नगर जिल्ह्यात एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून सासरी येण्यास नकार दिल्यानंतर दारूच्या नशेत संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर चाकू हल्ला केला त्यात पत्नी गंभीर जखमी झालेली आहे. पत्नी रक्तबंबाळ झाल्याचे लक्षात येताच आरोपीने स्वतःलाच जखमी करून घेतले. 

उपलब्ध माहितीनुसार , सुभाष हिरामण सोनवणे ( राहणार सोयगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक ) असे आरोपी पतीचे नाव असून त्याच्या विरोधात कोपरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 11 जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडलेली असून त्याच्या पत्नीच्या मामांनी याविषयी पोलिसात फिर्याद दिलेली आहे. 

सुभाष हिरामण सोनवणे आणि त्याची पत्नी संगीता सुभाष सोनवणे हे चासनळी येथे एका लग्नानिमित्त आलेले होते त्यानंतर सुभाष हा नाशिकला निघून गेला मात्र पत्नी इथेच राहिली होती. तिला घेण्यासाठी 11 जुलै रोजी सुभाष पुन्हा आला मात्र तिने येण्यास नकार दिला म्हणून भांडण झाले आणि त्यातून चाकू हल्ल्यापर्यंत प्रकरण पोहोचले. कोपरगाव पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे . 


शेअर करा