सुर्वेन्द्र गांधी यांना 60 दिवसात 50 लाख रुपये भरण्याचे आदेश 

शेअर करा

नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणात 291 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झालेला असून या प्रकरणातील आरोपी असलेले सुर्वेन्द्र गांधी यांना 60 दिवसात 50 लाख रुपये भरण्याचे आदेश केलेले आहेत . नवी दिल्ली येथील न्यायालयाने सातत्याने न्यायालयात उपस्थित न राहणे , चालढकल करणे , वेगवेगळ्या भूमिका घेणे , कोर्टात गैरहजर राहणे तसेच दंडाची रक्कम न भरणे याविषयी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे. 

सुर्वेन्द्र गांधी यांच्या वतीने ,’ चेकवरील सही माझी आहे मात्र घेतलेली रक्कम प्रविण उर्फ बाळासाहेब नाहटा यांनी घेतलेली आहे. माझे दिवंगत पिता स्व. दिलीप गांधी यांनी या व्यवहारात मध्यस्थी केली होती. माझे चेकबुक माझे वडीलांकडे होते त्यांनी ते चेक गॅरंटी म्हणून दिले होते.’ असा वकिलांनी युक्तिवाद केलेला होता. 

माननीय न्यायालयाने सुर्वेन्द्र गांधी यांची ही भूमिका अमान्य केलेली असून व्यवहारातील रक्कम सुर्वेन्द्र गांधीच्या खात्यात गेल्याचे स्पष्ट होत असून इतका मोठा व्यवहार कोणी दुसऱ्यासाठी करेल असे अशक्य वाटते असे  निरीक्षण नोंदवत पहिला परतफेड हप्ता म्हणून ५० लाख रूपये ६० दिवसांत भरण्याचे आदेश दिले आहेत  आणि पुढील तारीख 12 ऑगस्ट 2024 दिलेली आहे.


शेअर करा