महाराष्ट्र्रात डॉक्टरने शेअर ब्रोकरचे अपहरण केल्याची घटना

शेअर करा

An incident where a doctor kidnapped a stock broker in Maharashtra

शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीनंतर अपेक्षित असा नफा मिळाला नाही म्हणून झालेला तोटा भरून काढण्यासाठी एका ब्रोकरचे त्याच्याच कारमध्ये अपहरण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यात समोर आलेला आहे. तीन जणांनी या ब्रोकरचे अपहरण केले आणि अमरावती इथे नेऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. महाराष्ट्र्रात डॉक्टरने शेअर ब्रोकरचे अपहरण केल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. 

संबंधित शेअर ब्रोकर यांचे नाव नितीन भास्कर सरोदे असे असून पुण्यात ते काही वर्षांपासून शेअर ब्रोकर म्हणून व्यवसाय करतात. आरोपी डॉक्टर सुहास भांबुरकर , अल्पेश गुडदे आणि भूषण तायडे ( सर्वजण राहणार अमरावती ) अशी आरोपींची नावे आहेत. 

येरवडा पोलिसात याप्रकरणी ट्रेडर यांचे मावसभाऊ यांनी गुन्हा दाखल केलेला असून आरोपींनी 50 लाख रुपये शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायात सरोदे यांच्या माध्यमातून अडकवलेले होते मात्र अपेक्षित असा नफा होण्याऐवजी तोटा झाला त्यामुळे अखेर या तोट्याला सरोदे जबाबदार आहेत असा आरोपींचा संशय होता त्यातून पुढील प्रकार घडला. 


शेअर करा