25 जुलैपासून राज्यभरात आरक्षण बचाव यात्रा

शेअर करा

25 जुलैपासून राज्यभरात आरक्षण बचाव यात्रा

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आता आरक्षण बचाव जनजागृती यात्रा काढण्यात येणार असून कुणबी मराठा आरक्षणात सगळे सोयरे ही भेसळ ठरत आहे. कुणबी व्यक्तींना पूर्वीपासूनच आरक्षण आहे. ज्यांनी अर्ज केला नाही त्यांनाही सरकार प्रमाणपत्र देत आहे त्यामुळे या बाबी शोधून दिलेले प्रमाणपत्र रद्द करावे म्हणून 25 जुलैपासून राज्यभरात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. 

एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात माहिती देताना ,’ 26 जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली. ओबीसीचे काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी तुम्ही हा लढा हातात घ्या अशी आपल्याला विनंती केली म्हणून आरक्षण बचाव यात्रा आपण चैत्यभूमीपासून सुरू करणार असून त्याचा समारोप छत्रपती संभाजीनगर इथे सहा किंवा सात ऑगस्टला होईल ,’ असे म्हटलेले आहे. 

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की ,’ राज्यात श्रीमंत मराठ्यांनी वाद लावून दिलेला असून त्यामुळे जी परिस्थिती झालेली आहे ती भयानक आहे म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्यात राष्ट्रवादीचा शरद पवार गट , काँग्रेस शिवसेनेचा ठाकरे गट यापैकी कोणीच उपस्थित नव्हते. हे तीनही श्रीमंत पक्ष जोपर्यंत आपली भूमिका मांडत नाही तोपर्यंत तोडगा निघणार नाही म्हणून आता दंगल होण्याची वाट पाहू नये,’ असे देखील ते पुढे म्हणाले


शेअर करा