नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून बायको आणि मुलींना मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलीस अटक करत नाहीत यावरून एका व्यक्तीने नगर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारातच विषारी औषध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , रमेश काळे ( राहणार देऊळगाव सिद्धी तालुका नगर ) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून गायरान जमिनीच्या वादातून काही जणांनी रमेश काळे आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केलेली होती. पोलिसांनी अद्यापपर्यंत आरोपींना अटक केली नाही तसेच काहीही कारवाई केली नाही असा आरोप रमेश काळे यांनी केलेला आहे .
रमेश काळे हे सोमवारी 15 तारखेला दुपारी नगर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात पोहोचलेले होते त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे आरोपींवर कारवाई करणे विषयी चौकशी देखील केली मात्र पोलिसांच्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही म्हणून विषारी औषध पिऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. रमेश काळे यांच्या विरोधात त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.