महाराष्ट्रात सध्या बहुतांश जिल्ह्यात पाऊस सुरू असून त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आधीच दुर्गम भागात रस्त्यांची वानवा असून पावसामुळे प्रचंड हाल होत असल्याकारणाने अखेर एका गर्भवती महिलेला नाला ओलांडून घेऊन जाणे अशक्य झाल्याने अखेर जेसीबीच्या बकेटमध्ये बसून नाला पार करावा लागलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ही घटना सध्या चर्चेत आहे.
उपलब्ध माहितीनुसार , जेवरी संदीप मडावी ( वय 22 राहणार कुडकेली ) असे या महिलेचे नाव असून आलापल्ली ते भामरागड या रस्त्यावर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे मात्र मुसळधार पावसात पर्यायी मार्ग वाहून गेला त्यामुळे रहदारीच बंद झाली आणि नाल्याला पूर आल्यानंतर महिलेच्या पोटात प्रसूती कळा सुरू झाल्या
प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात जात असताना वाटेत नाला आडवा आला आणि त्यातून रुग्णवाहिका घेऊन जाणे शक्य नव्हते म्हणून जेसीबीच्या बकेटमध्ये बसून महिलेला पलीकडील बाजूला नेऊन सोडण्यात आले .