रस्त्यावर असलेल्या दुकानदारांना त्यांची नावे उघड करण्याचे निर्देश 

शेअर करा

रस्त्यावर असलेल्या दुकानदारांना त्यांची नावे उघड करण्याचे निर्देश

समाजात धार्मिक द्वेष निर्माण करणे हा प्रकार उत्तर प्रदेशात सरकारमान्य झालेला असून असाच एक दुर्दैवी निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतलेला आहे. कावड यात्रेच्या दरम्यान रस्त्यावर असलेल्या दुकानदारांना त्यांची नावे उघड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. 

काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केलेली असून अशा पद्धतीने नावे उघड करून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने सामाजिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. भगवान शिव यांच्या तत्त्वाच्या विरोधात ही बाब असून भगवान शिव यांची शिकवण सरकारलाच समजलेली नाही असेही सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या आहेत. 

सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की , ‘ भाजीपाल्याचे दर सामान्य माणसांना परवडणारे नाहीत आणि महागाई कमी करण्यासाठी केंद्राकडून कुठलीही पावले उचलली जात नाहीत. लोकांच्या हिताचे निर्णय राज्य आणि केंद्र सरकार घेत नाही ,’ अशी देखील चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे . 


शेअर करा