शेतकऱ्यांना धमकवण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल तीन काडतुसे आणि ..

शेअर करा

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या बाणेर इथे नॅशनल कॉलनीत असलेल्या बंगल्याची पुणे ग्रामीण पोलिसांनी देखील झडती घेतली असून शेतकऱ्यांना धमकवण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल तीन काडतुसे आणि लँड क्रूजर गाडी हे पोलिसांनी जप्त केले आहे. 

पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्यासोबत त्यांचे वडील दिलीप खेडकर आणि अंगरक्षक अशा एकूण सहा सात जणांच्या विरोधात पौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पांडुरंग कोंडीबा पासलकर ( वय 65 ) यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दिलेली आहे. 

मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिलेला होता मात्र त्यासाठी घालण्यात आलेल्या अटींचे त्यांनी उल्लंघन केले असे लक्षात आल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शस्त्र परवाना रद्द करणे विषयी देखील मनोरमा खेडकर यांना नोटीस बजावत त्यांच्याकडून खुलासा मागवलेला आहे .


शेअर करा