शेखर देशपांडे यांच्या अंतरीम अटकपूर्व जामीनाबाबत आज सुनावणी , पोलिसांना आरोपी सापडेनात

शेअर करा

अहमदनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे हे त्यांच्या स्वीय सहायकासोबत लाचखोरी प्रकरणात अडकल्यानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश निरंजन नाईकवाडी यांच्यासमोर आज जावळे यांचे स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे यांच्या अंतरीम अटकपूर्व जामीनाबाबत आज सुनावणी होणार असून संपूर्ण शहराचे लक्ष या सुनावणीवर लागून राहिले आहे. 

मूळ फिर्यादीतर्फे एडवोकेट अभिजीत पुप्पाल तर एडवोकेट अनिल घोडके हे सरकारच्या बाजूने तर शेखर देशपांडे यांच्या वतीने एडवोकेट महेश तवले सध्या काम पाहत आहेत. 

नगर शहरातील नालेगाव येथील एका भूखंडावर बांधकाम प्लॅन मंजूर करण्याच्या बाबत पंकज जावळे यांनी त्यांच्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून लाच मागितली असा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या विरोधात तोफखाना पोलिसात दाखल केलेला आहे. 

18 मार्चला महापालिका प्रशासनाकडे परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आला आणि पैसे मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक मंजुरी रखडवण्यात आली होती. कारवाईचा अंदाज येताच डॉक्टर पंकज जावळे हे स्वीय सहायकासोबत फरार झालेले होते. 

जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात या संदर्भात तक्रार देण्यात आली त्यानंतर पथकाने शहानिशा केली त्यावेळी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचे स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे यांनी बांधकामाला मंजुरी देण्यासाठी नऊ लाखांची मागणी केल्याचे समोर आले मात्र कारवाईचा संशय येताच जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक दोघेही पळून गेले होते.


शेअर करा