राजे शिवाजी पतसंस्थेचे चेअरमन आजाद ठुबे यांना ‘ ह्या ‘ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

शेअर करा

पारनेर तालुक्यातील राजे शिवाजी पतसंस्थेचे चेअरमन आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आजाद ठुबे यांना पारनेर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केलेली असून 25 जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पारनेर यांच्या वतीने या संदर्भात पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आलेली असून आझाद ठुबे , रंजीत पाचारणे , पोपट ढवळे आणि पतसंस्थेचे व्यवस्थापक संभाजी भालेकर यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आझाद ठुबे आणि इतर आरोपी पोलिसांना मिळून येत नसल्याने पोलिसांच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते.

रविवारी एकवीस तारखेला आझाद ठुबे हे कान्हूर पठार इथे त्यांच्या घरी आल्याची माहिती पारनेर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना समजल्यानंतर रात्री साडेअकराला त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. राजे शिवाजी पतसंस्थेत फसवणूक प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.


शेअर करा