नगर शहरात आज एक दुर्दैवी घटना चांदणी चौक इथे उड्डाणपुलावर घडलेली असून एक चार चाकी ट्रक उड्डाण पुलावरून खाली कोसळला. नगरमध्ये उड्डाणपुलाचा काही भाग तोडत ट्रक खाली कोसळला आणि त्यानंतर दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत.
उड्डाणपूल उदघाटन झाले त्या पहिल्याच दिवशी उड्डाणपणावर एक अपघात झालेला होता त्यानंतर ही मालिका थांबायला तयार नाही. यापूर्वी देखील अनेकदा याच उड्डाणपुलावर अपघात झालेले असून काही जणांनी प्राण गमावलेले आहेत. चांदणी चौकाजवळ असलेले वळण हे उड्डाणपूल होण्याआधी देखील धोकादायक होते आणि उड्डाणपूल झाल्यानंतर देखील धोकादायक असल्याचे घडलेल्या घटनांवरून दिसून येत आहे.