प्रेयसीच्या मृतदेहासोबत तिच्या मुलांनाही पाण्यात फेकल्याने तीनही जणांचा मृत्यू 

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुणे जिल्ह्यात समोर आलेली असून गर्भपात करतेवेळी विवाहित प्रेयसीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला. तिची दोन्ही मुले आईचा मृतदेह पाहून रडू लागल्यानंतर संतप्त झालेला आरोपी प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी त्यांना देखील नदीत फेकून दिले. तीनही जणांचा या घटनेत मृत्यू झालेला असून चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून दोन जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. प्रेयसीच्या मृतदेहासोबत तिच्या मुलांनाही पाण्यात फेकल्याने तीनही जणांचा मृत्यू झालेला आहे

उपलब्ध माहितीनुसार , समीरण निसार नेवरेकर ( वय 25 वर्ष राहणार वराळे तालुका मावळ )  असे मयत महिलेचे नाव असून तिच्या पाच वर्षीय आणि दोन वर्षीय मुलांचा पाण्यात फेकल्याने मृत्यू झालेला आहे. मुख्य आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर ( वय 37 वर्ष राहणार वराळे तालुका मावळ ) याच्यासोबत रविकांत भानुदास गायकवाड ( वय 41 राहणार डॉन बॉस्को कॉलनी सावेडी ) याला पोलिसांनी अटक केलेली असून गर्भपात करणारी महिला आणि संशयित डॉक्टर अद्यापपर्यंत मिळून आलेले नाहीत. 

आरोपी आणि मयत महिला यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यातून समीरण हिला दिवस गेले . तिचा गर्भपात करण्यासाठी कळंबोली येथील अमर हॉस्पिटल येथे तिला दाखल करण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाला तरी त्या संदर्भातील माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली नाही आणि तिचा मृतदेह रविकांत गायकवाड आणि एक महिला यांच्या ताब्यात दिला. 

दोन्ही आरोपींनी संगनमत करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले आणि इंद्रायणी नदीच्या पात्रात तिचा मृतदेह फेकून दिला. समीरण हिचे दोन्ही मुले यावेळी रडू लागली म्हणून आरोपींनी त्यांना देखील इंद्रायणी पात्रात फेकून दिले पोलीस सध्या उर्वरित दोन्ही आरोपींचा शोध घेत असून पुणे जिल्ह्यात या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. 


शेअर करा