नगर जिल्ह्यात एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून कोपरगावात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाचा खून करण्यात आलेला आहे. कोपरगावातील आयेशानगर येथील ही घटना असून सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सोहेल हरून पटेल ( वय 28 वर्ष राहणार आयेशा कॉलनी कोपरगाव ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून मच्छिंद्र सोनवणे , स्वप्नील गायकवाड , महेश कट्टे , विकी परदेशी अशा एकूण सहा जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 21 जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सोहेल पटेल याला कोपरगाव शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाजवळ आरोपींनी गाठले आणि बेदम मारहाण केली. सोहेल यास आरोपींनी त्यानंतर कर्मवीर नगर भागातील एका प्लॉटमध्ये नेत लोखंडी खिळे असलेल्या बांबूने मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला.
मयत तरुणाचे कुटुंबीय , नातेवाईक व इतर समाज बांधव यांनी त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केलेली आहे .