महाराष्ट्र हादरला.. प्रियकराने पेटवलेली प्रेयसी ‘ तब्बल १२ तास ‘ रस्त्यावर मागत होती मदत : कुठे घडली घटना ?

  • by

पहाटेच्या वेळीच त्याने तिला गाडीवरून उतरवून जंगलात नेले आणि इथे ऍसिड टाकून पेटवून दिले. महाराष्ट्राला हादरवणारी घटना बीड जिल्ह्यात घडली असून प्रियकर हा नांदेड जिल्ह्यातील असल्याचे समजते. नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील हा तरुण असून बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा केज रस्त्यावर येलंबघाट येथे ही घटना घडली. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

उपलब्ध माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील अविनाश राजूरे याचे गावातील एका २२ वर्षीय तरुणी सोबत प्रेमसंबंध जुळले होते. ते दोघेही पुण्यात एकत्र राहत होते. दिवाळी निमित्त शनिवारी हे दोघेही दुचाकीने पुण्याहून गावाकडे निघाले होते. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास बीड जिल्ह्यातील येलंबघाट जवळ अविनाशनं दुचारी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर प्रेयसीला रस्त्यापासून दूर एका खड्यात नेऊन तिच्यावर ऍसिड टाकले त्यानंतर पेट्रोल ओतून तिला पेटवून देऊन तो तिथून पसार झाला.

तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, पहाटेची वेळ असल्यानं कुणीही मदतीला येऊ शकले नाही. मोठ्या प्रमाणावर भाजलेली ही तरुणी तब्बल १२ तास रस्त्यालगत पडून होती. दुपारी तीनच्या सुमारास एका वाहनधारकाला तिचा आवाज ऐकू आला. त्यानं तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर जखमी तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.