नगरमधील चांदणी चौकातील अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू 

शेअर करा

नगरमधील चांदणी चौकातील अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू

नगर शहरातील चांदणी चौक येथे उड्डाण पुलावरून मालवाहतूक करणारा टेम्पो संध्याकाळी चारच्या सुमारास कोसळला या घटनेत दोन जण गंभीर जखमी झालेले होते त्यातील एकाचा मृत्यू झालेला आहे. नगरमधील चांदणी चौकातील अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आल्यानंतर उड्डाण पुलावरील या ठिकाणी असलेला वाहतुकीचा धोका पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. 

पीव्हीसी पाईपची वाहतूक करणारा एक ट्रक छत्रपती संभाजीनगर वरून पुण्याच्या दिशेने जात होता. हॉटेल अशोकाजवळ उड्डाणपुलावर ट्रक आल्यानंतर उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूच्या कठड्याला टेम्पो आढळला आणि खाली कोसळला. लष्करी विभागाच्या कार्यालयाची संरक्षण भिंत यामुळे पडली. 

टेम्पो मधील एक जणांचा जागीच मृत्यू झालेला असून एक जण गंभीर जखमी झालेला आहे . सदर घटना समजताच नगर शहरातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती . कोतवाली , भिंगार कॅम्प आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली.


शेअर करा