अहमदनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे हे लाचखोरी प्रकरणात आपल्या स्वीय सहायकासोबत कारवाईत अडकले होते त्यानंतर पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय सहायक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात तोफखाना पोलिसात गुन्हादेखील दाखल करण्यात आला मात्र अद्यापदेखील ते दोघे फरार आहेत. श्रीधर देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.
डॉक्टर पंकज जावळे यांचा अंतिम अटकपूर्व जामीन अर्ज त्यांचे वकील सतीश गुगळे यांनी माननीय न्यायालयात दाखल केलेला होता मात्र न्यायालयाकडून एकीकडे पंकज जावळे यांना जामीन मिळून देण्यात ऍडव्होकेट सतीश गुगळे यांना अपयश आले तर दुसरीकडे सहायक श्रीधर देशपांडे यांचा देखील अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश निरंजन नाईकवाडी यांनी फेटाळला आहे.
आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांनी बांधकाम मंजुरी देण्यासाठी नऊ लाख रुपयांची मागणी केलेली होती. फिर्यादी यांनी बांधकाम परवाना ऑनलाइन मंजुरीसाठी अर्ज केलेला होता मात्र पैशासाठी त्यांचे काम रखडवण्यात आले. महापालिकेत कारवाईसाठी सापळा लावण्यात आला मात्र पंकज जावळे आणि श्रीधर देशपांडे दोघेही त्यादिवशी रजा टाकून फरार झाले.
श्रीधर देशपांडे यांच्या वतीने अटकपूर्व अर्ज दाखल करण्यात आलेला होता. मूळ फिर्यादी यांच्यातर्फे अभिजीत पुप्पाल तर सरकारतर्फे सीडी कुलकर्णी यांनी याप्रकरणी युक्तिवाद केला तर श्रीधर देशपांडे यांच्यावतीने एडवोकेट महेश तवले यांनी काम पाहिले.