घरासमोर मुरूम का टाकला असे म्हणत सरपंचावरच कोयत्याने हल्ला

शेअर करा

घरासमोर मुरूम का टाकला असे म्हणत सरपंचावरच कोयत्याने हल्ला

नगर येथे एक धक्कादायक असा प्रकार नगर तालुक्यात एक धक्कादायक असा प्रकार सुरू समोर आलेला असून गावातील रस्त्याचे काम सुरू असताना घरासमोर मुरूम का टाकला असे म्हणत सरपंचावरच कोयत्याने हल्ला करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे नगर तालुक्यातील घोसपुरी येथे ही घटना घडलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार ,अय्याज शौकत शेख असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा नगर तालुका पोलिसात दाखल करण्यात आला आहे. 

सरपंच किरण साळवे यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दिली असून गावात रस्त्यात चिखल असल्याकारणाने ग्रामपंचायतच्या वतीने मुरूम टाकण्याचे काम सुरू होते त्यावेळी किरण साळवे , उपसरपंच विठ्ठल हंडोरे आणि काही ग्रामपंचायती सदस्य हे कामकाजाची देखरेख करत होते. 

आरोपी शेख मोटरसायकलवर तिथे आला आणि त्याने साळवे यांना शिवीगाळ करत घरातून आणलेला धारदार कोयता आणत साळवे यांच्यावर हल्ला केला. साळवे यांनी त्यानंतर नगर तालुका पोलिसात त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.


शेअर करा