नगरमधून एक मोठी बातमी आलेली असून सावेडी तलाठी कार्यालयात तलाठी म्हणून काम पाहणारे सागर भापकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेली आहे. तोफखाना पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर भापकर हे अहमदनगर शहरातील सावेडी तलाठी कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून तलाठी म्हणून कामकाज पाहत होते. सावेडी परिसरातील काही प्लॉटची नोंदणी करण्यासाठी सागर भापकर यांनी चाळीस हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली आणि त्यानंतर कारवाई करण्यात आली.