नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणातील फॉरेन्सिक ऑडिटमधील आरोपी तथा बँकेचे माजी संचालक कमलेश हस्तीमल गांधी ( राहणार शेवगाव ) यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात कमलेश गांधी यांच्यावर बँकेच्या कर्जदारांनी चार लाख रुपयांची रक्कम घेतल्याचा आरोप केलेला होता सोबतच 2014 पासून 2019 पर्यंत झालेल्या कर्ज प्रकरणात त्यांच्यावर जबाबदारी देखील टाकण्यात आलेली होती. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कमलेश गांधी यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी हा आदेश दिलेला असून कमलेश गांधी यांच्या वतीने एडवोकेट नितीन गवारे यांनी काम पाहिले आहे.