नेवासा शहरात भर बाजारपेठेत शनिवारी रात्री आग लागून तब्बल 14 ते 15 दुकाने पूर्णपणे जळून गेलेली होती. सदर घटनेनंतर अनेक व्यावसायिकांचे नुकसान झालेले असून वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते यांनी व्यापारी तसेच दुकानदारांची दुर्दैवी घटनेनंतर भेट घेतलेली आहे.
उत्कर्षाताई यांनी तिथे उपस्थित असलेले दुकानदार , तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही तसेच दुकानदारांना सरकारकडून त्वरित मदत मिळावी यासाठी योग्य त्या सूचना दिलेल्या असून वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुकाध्यक्ष पोपटराव सरोदे, युवक तालुकाध्यक्ष संतोष कसोदे , रंजन दादा जाधव तसेच इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.