नगर शहरात कत्तलीसाठी गोवंश वाहतूक करणाऱ्या आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी मुद्देमालासोबत ताब्यात घेतलेले असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार वासरे आणि तीन गाईंची सुटका करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, इरफान कुरेशी ( राहणार झेंडीगेट ) आणि जमीर सत्तार कुरेशी ( राहणार झेंडीगेट ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे असून छत्रपती संभाजीनगरपासून नगरकडे येणाऱ्या वाहनात कत्तल करण्यासाठी ही जनावरे आणण्यात आलेली होती.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना ही गोपनीय माहिती हाती मिळताच जेऊर बस स्टॅन्ड जवळ सापळा लावून पहाटे पाचच्या सुमारास टेम्पो ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला आहे . एमआयडीसी पोलिसांच्या या कारवाईचे परिसरात कौतुक केले जात आहे.