नगर तालुक्यात शॉक लागून शेतकऱ्याने गमावले प्राण , ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

शेअर करा

नगर तालुक्यात एक दुर्दैवी घटना समोर आलेली असून विद्युत पंप सुरू करत असताना शॉक लागल्यानंतर एका शेतकऱ्याचा दुर्दैवी या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. बायजाबाई जेऊर येथील ही घटना असून 25 तारखेला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. 

संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यानंतर मयत शेतकऱ्याचा मृतदेह महावितरणच्या कार्यालयात आणून ठिय्या आंदोलन केले. रवींद्र बाळासाहेब पाटोळे असे मयत शेतकऱ्याचे नाव असून गुरुवारी शेतात पंप चालू करण्यासाठी ते गेले होते त्यावेळी ही घटना घडली. शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. 


शेअर करा