शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केट रॅकेटचे धागेदोरे संपूर्ण राज्यभरात पसरलेले असून शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या विरोधात शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , साईनाथ नामदेव भागवत ( राहणार शेवगाव ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून अनिरुद्ध मुकुंद धस , त्याच्या आई वैशाली मुकुंद धस ( दोघेही राहणार सातपुते नगर शेवगाव ) अशी आरोपींची नावे आहेत . एडी ट्रेडिंग कंपनी या नावाने अनिरुद्ध धस याने शेअर मार्केट ट्रेडिंग व्यवसाय सुरू केलेला होता मात्र त्यात फिर्यादी यांची फसवणूक झाली.
दुसरी फिर्याद गदेवाडी येथील नवनाथ ईसरवाडे यांनी दिलेली असून अमोल अशोक कदम, अशोक बाबुराव कदम , लक्ष्मण दत्तात्रय मडके ( राहणार गदेवाडी ) अशी आरोपींची नावे आहेत. नवनाथ ईसरवाडे यांनी आरोपीकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पाच लाख तर इतर व्यक्तींनी देखील लाखोंची रक्कम अडकवली होती मात्र त्यात त्यांच्या फिर्यादी यांची फसवणूक झालेली आहे.